शक्ती कपूरचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत, बंगळूर पाेलिसांची कारवाई | पुढारी

शक्ती कपूरचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत, बंगळूर पाेलिसांची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाॅलीवूड अभिनेता शक्ती कपूर याचा मुलगा सिद्धार्थ कपूरला अंमली पदार्थ सेवन ( ड्रग्‍ज ) प्रकरणी बंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. बंगळूर मधील एका पार्टीत सिद्धार्थला ‘डीजे’ म्‍हणून निमंत्रण हाेते. एका हाॅटेलमध्‍ये या पार्टीचे आयाेजन करण्‍यात आले हाेते.

या पार्टीवर पाेलिसांनी छापा टाकला. यावेळी ताब्‍यात घेण्‍यात आलेल्‍या ३५ जणांची वैद्‍यकीय चाचणी घेण्‍यात आली. यामधील ६ जणांनी ड्रग्‍ज (अंमली पदार्थ ) घेतल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. यामध्‍ये  सिद्धार्थ कपूरचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ड्रग्‍ज घेतल्‍याप्रकरणी सिद्धार्थ कपूरसह सहा जणांविराेधात अंमलपदार्थ प्रतिबंधित कायदान्‍वये गुन्‍हा दाखल झाला आहे. आज त्‍याला न्‍यायालयात हजर करण्‍यात येणार आहे.

 

Back to top button