सोलापूर : बार्शीत पोलीसाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

सोलापूर : बार्शीत पोलीसाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मद्यपान करून शिवीगाळ व गोंधळ घालणार्‍यांनी पोलिसाला मारहाण केली. शुक्रवारी (१० जून) बार्शी शहरातील सुभाष नगर परिसरातील रोटरी क्लबच्या पाठीमागे ही घटना घडली. या प्रकरणी रोहित बाळू शिंदे व वैभव जाधव ( रा.सुभाषनगर बार्शी ) या संशयित आराेपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

रोटरी क्लबच्या पाठीमागे काही जण दारु पिऊन धिंगाणा  घालत हाेते. तसेच अश्‍लील शिवीगाळ करत आरडाओरडा करत हाेते. याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक शिरसट व महेश महेश माने यांना मिळाली.  ते घटनास्थळी गेले. रोहित व वैभव हे मद्‍यधुंद अवस्‍थेत शिवीगाळ करत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा करताच ते पाेलिसांनाही शिवीगाळ करु लागले. त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस महेश माने यांना मारहाण केली. तर सपोनि शिरसाट यांनाही ढकलून देत शिवीगाळ केली. वैभव जाधव हा तेथून पसार झाला. पाेलिसांनी  रोहित शिंदे यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस  माने यांचे फिर्यादीवरून दोन्ही संशयित आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचलंत का ?

 

Back to top button