भाड्याच्या संगणक, लॅपटॉपची परस्पर विक्री
पिंपरी : भाड्याने दिलेल्या संगणक व लॅपटॉपची परस्पर विक्री करून एकाची 23 लाख 88 हजार 700 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 11 मार्च 2020 ते जून 2022 दरम्यान हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी पंकज जोशी (33, रा. रविवार पेठ) यांनी गुरुवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रकाश पुंडे, अंकुश वानखेडे, लालजी पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.