Prajkta Mali : ‘जो scene माझ्या कारर्किदीतला’ म्हणत प्राजक्ता माळीची आणखी एक पोस्ट | पुढारी

Prajkta Mali : 'जो scene माझ्या कारर्किदीतला' म्हणत प्राजक्ता माळीची आणखी एक पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajkta Mali) रानबाजार वेबसीरीजमध्ये बोल्ड सीन देऊन धुमाकूळ घातला आहे. टीव्ही मालिकेतून सुरुवात करणारी ही अभिनेत्री आज वेबसीरीजमध्ये चमकतेय. रानबाजार या वेबसीरिजमुळे ती आणखी चर्चेत आलीय. (Prajkta Mali) एकामागून एक पोस्ट टाकून आपल्या रानबाजारविषयी काय वाटतं, हे तिने बिनधास्तपणे आपल्या पोस्टच्या माध्यमातून लिहिले आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये प्राजक्ताने आपल्या कारर्किदीतला बेस्ट सीन असल्याचं म्हटलं असून, तिने संपूर्ण पोस्टमध्ये काय लिहिलं आहे पाहा-

प्राजक्ता लिहिते-

आणि जो scene माझ्या कारर्किदीतला one of the best scene आहे (अस फक्त मला नाही, अनेक जणांना वाटतय..) तो scene असलेला episode काल प्रदर्शित झाला… (one take one shot) 🎯
.#raanbaazaar

या कॅप्शनसोबत ती रानबाजारमदील साडीतील लूक असलेला एक फोटो पोस्ट केलाय. आज काही तासांपूर्वी लिहिलेल्या या पोस्टवर नेटकरी कमेंट्स पाऊस पाडताहेत.

नेटकरी म्हणताहेत-प्राजू खरंच खूप उत्तम अभिनय तु या वेबसीरिजमध्ये केलंय..! आम्हाला fans ना आणि fan club’s ना तुझा खुप अभिमान वाटतो…तु चौकटी घ्या बाहेर जाऊन काही वेगळं केलंय खूप आनंद होतो आहे..खूप खूप शुभेच्छा…! 😍👏🔥🙌❤️❤️❤️ खरंच one of the best scene …🔥🔥#lotsoflove #prajuarmy

आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय-अंगावर काटा आला पाहून.. 🥺😍🙌 hatts off girl. You rock.

दुसऱ्या नेटकर्‍याने म्हटलंय-yess!! we love you RATNA❤️, arch Chan..bhumika “Ranbajar”..nttu😍😍 अशाही कमेंट्स तिला दिल्या जात आहेत.

राबाजारमध्ये तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत आहे. सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात, माधुरी पवार असे मराठी कलाकारांची फौज वेब सीरिजमध्ये आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Back to top button