Aashram 4 : बाबा निरालाला होणार अटक, पम्मीची ‘आश्रम’मध्ये वापसी | पुढारी

Aashram 4 : बाबा निरालाला होणार अटक, पम्मीची ‘आश्रम’मध्ये वापसी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉबी देओलच्या लोकप्रिय वेब सीरिज आश्रमचा तिसरा सीझन खूप चर्चेत आहे. सीझन 3 च्या आगमनानंतर आश्रम सीझन 4 चा (Aashram 4) टीझर देखील रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये बॉबी देओल स्वत:ला देव म्हणवत आहे. अभिनेत्री त्रिधा चौधरी, चंदन रॉय सन्याल, अदिती पोहनकर आणि दर्शन कुमार देखील दिसत आहेत.

आश्रम 4 चा टीझर रिलीज (Aashram 4)

बॉबी देओल आणि एमएक्स प्लेयरने आश्रम 4 चा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बाबा अंतर्यामी आहेत, ते तुमचे मन जाणतात. म्हणूनच आश्रम 3 च्या एपिसोड सोबत आम्ही आश्रम 4 ची झलक देखील घेऊन आलो आहोत. (Aashram 4)

टीझरच्या सुरुवातीला बॉबी निराला बाबाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या नावाचा जप केला जात आहे. यानंतर बाबा निराला म्हणतात, ‘मीच देव आहे. मी तुमच्या कानांच्यावर मी स्वर्गाची निर्मिती केली आहे. तुम्ही देवाला कसे अटक करू शकता.’ टीझरमध्ये पम्मी पहेलवान आश्रमात परतल्याचे दाखवण्यात आले आहे. नव्या सीझनमध्ये पम्मीही नववधूच्या भूमिकेत दिसणार आहे. (Aashram 4)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

टीझर पाहता, यावेळी बाबा निरालाच्या कृत्यांचा अखेर पर्दाफाश होईल आणि तो पोलिसांच्या हाती लागेल, असे दिसते. पम्मी पहेलवानही मोठा विचार करून आश्रमात परतली आहे. त्याच वेळी, बाकीच्या पात्रांना पाहणे मनोरंजक असणार आहे. (Aashram 4)

2023 मध्ये आश्रम 4 येईल. बॉबी देओल, चंदन रॉय सन्याल, आदिती पोहनकर, तुषार पांडे, दर्शन कुमार, त्रिधा चौधरी आणि अनुप्रिया गोएंका हे कलाकार वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. आश्रमचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे.

बरेच वाद असूनही बॉबी देओलच्या आश्रम या वेब सीरिजचे पहिले दोन्ही सीझन धमाकेदार हिट झाले. दोन्ही सीझनच्या या यशानंतर आता या सीरिजचा तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आहे. दरम्यान, तिसऱ्या सीझनमध्ये बहुतांश पात्रे तीच आहेत, मात्र यावेळी बॉबी देओलसोबत अभिनेत्री ईशा गुप्ताही यात झळकली आहे. इशाच्या एन्ट्रीमुळे ही मालिका मनोरंजक आणि तितकीच बोल्ड झाल्याची चर्चा आहे. (Aashram 4)

Back to top button