पुणे : अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांवर गुन्हा | पुढारी

पुणे : अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांवर गुन्हा

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देण्याचा प्रकार खेड-शिवापूर (ता. हवेली) येथे नुकताच घडला आहे. याप्रकरणी खुद्द मुलीनेच आई-वडील आणि सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी मुलीचे आई- वडील आणि सासरची मंडळी अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

केज-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली; आणखी ४ जणांचा मृत्यू

खेड-शिवापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे रोजी खेडशिवापूर येथील एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याची घटना घडली होती. ११ दिवसानंतर पीडित मुलगी आई- वडिलांच्या घरी निघून गेल्यानंतर देखील आई- वडिलांनी तिला ‘तुझे आता लग्न झालेले आहे, तू तुझ्या सासरी नांदायला जा, असा तगादा लावल्यानंतर मुलीने थेट चुलत भावाला घेऊन पोलिस ठाणे गाठले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मीर पंडितांना वाचवा; संजय राऊतांचा भाजपला टोला

अधिक माहिती अशी की, पाच महिन्यांपूर्वी लग्न लावून देण्याबाबत मुलीला घरात समजताच तिने तिच्या आई-वडिलांना ‘मला अजून शिक्षण घ्यायचे आहे, एवढ्या लहान वयात लग्न करायचे नाही, असे सांगून लग्नासाठी स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झालेनंतरसुद्धा मुलीने लग्नाला नकार दिला होता. तरीसुद्धा मुलीचे आई–वडील, मध्यस्थी व मुलाकडील मंडळींना मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील या सर्वांनी मिळून मुलीची इच्छा नसताना संगनमत करून अल्पवयीन मुलीचे ३० वर्षीय मुलाबरोबर लग्र लावून दिले होते.

राहुल गांधींना ईडीची पुन्हा एकदा नोटीस

या वेळी इतर नातेवाईक देखील या लग्नाला उपस्थित होते. याप्रकरणी मुलीने फिर्याद दिली असून, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम अधिक तपास करीत आहेत.

Back to top button