पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत जाहिरात फ्लेक्सवर कारवाई | पुढारी

पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत जाहिरात फ्लेक्सवर कारवाई

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड व टपर्‍यांवर धडक कारवाई केली जात आहेत. शहर स्वच्छतेसाठी विनापरवाना फ्लेक्सही हटविले जात आहेत. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील अनेक अनधिकृत फ्लेक्स क्रेनद्वारे मंगळवारी १ जून रोजी हटविण्यात आले.

आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ लवकरच होणार खाऊगल्ली; महापालिका आयुक्त पाटील यांची मान्यता

अनधिकृत बांधकाम, पत्राशेड, टपर्‍यांवर पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील अनेक भागात कारवाई सुरू आहे. पुणे- नाशिक महामार्गाच्या रूंदीकरणासाठी अनेक घरे व दुकाने हटविण्यात आली. तसेच, शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून अनधिकृत होर्डिंग व फ्लेक्सवरही कारवाई जोरात केली जात आहे.

महाविकास आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या अनेकांच्या उमेदवारीला लागणार ‘ब्रेक’

अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने मंगळवारी १ जून रोजी दापोडी ते निगडी या मार्गावर ग्रेडसेपरेटर, पादचारी मार्ग, सीमा भिंत, चौकात लावलेले अनेक फ्लेक्स हटविण्यात आले. उंचावरील स्वागत कमानीवरील फ्लेक्स काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. अनेक दिवसापासून लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स हटल्याने स्वागत कमानीवरील दिशादर्शक नावे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. त्यामुळे वाहनचालक समाधान व्यक्त करीत आहेत.

Back to top button