पुणे : निवृत्त पोलिस अधिकार्‍याची फसवणूक केलेल्या करणारा जेरबंद | पुढारी

पुणे : निवृत्त पोलिस अधिकार्‍याची फसवणूक केलेल्या करणारा जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कर्जाचा बोजा असलेल्या सदनिकेची व्रिकी करून निवृत्त पोलिस अधिकार्‍याला फसवणूक करणार्‍या ठगाला मार्केटयार्ड पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मालोजीराव रंगराव काकडे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणात त्याची पत्नी निषा मालोजीराव काकडे (३६, रा.गंगाधाम फेज १, मार्केटयार्ड) हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्यावर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात ७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत निवृत्त पोलिस अधिकारी यांची पत्नी तारा रामचंद्र घुगे (रा. बिबवेवाडी, मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडे दाम्पत्याने घुगे दाम्पत्याला त्यांची गंगा धाम फेज १ येथील सदनिका विक्रीचे आमिष दाखविले. त्या आमिषालाही घुगे दाम्पत्य बळी पडले. काकडे दाम्पत्याने सदनिकेवर केवळ ५० लाखांचे कर्ज असल्याचे सांगून ४९ लाख रूपयांना घुगे यांना सदनिका विकण्याचे ठरविले. त्यासाठी घुगे यांनी काकडे दाम्पत्याला इसारत स्वरूपात २९ लाख रूपये दिले. परंतु, त्यांना सदनिकेवर ६६ लाख रूपयांचे कर्ज असल्याचे समजले. ही गोष्ट काकडे यांनी लपवून ठेऊली असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात काकडे याला सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा

Back to top button