बेळगाव : अंकली येथील क्रेडिट सोसायटीच्या लॉकरमधून दीड कोटींचे दागिने लंपास | पुढारी

बेळगाव : अंकली येथील क्रेडिट सोसायटीच्या लॉकरमधून दीड कोटींचे दागिने लंपास

अंकली(बेळगाव), पुढारी वृत्‍तसेवा : रायबाग तालुक्यातील हदीगुंद येथे श्री महालक्ष्मी को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयावर शनिवारी (दि. 29) रात्री अज्ञात चोरटयांनी दरोडा टाकला. लॉकरमधील सुमारे दीड कोटी रुपयांचे दागिने लंपास केले. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्‍यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान दलाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रायबाग तालुक्यातील हंदिगुदं येथे गेल्या सव्वीस वर्षांपासून श्री महालक्ष्मी को ऑप क्रेडिट सोसायटीची कार्यरत आहे. या संस्थेचे सभासद व ग्राहकांनी विश्वासाने सोने तारण कर्ज घेऊन सोने गहाण ठेवले होते. मात्र अज्ञात चोरटयांनी दरोडा टाकून लॉकरमधील सर्व दागिने लंपास केले. सदर दागिन्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी सदर घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष बनापा तेली म्हणाले की, अज्ञात दरोडेखोरांनी संस्थेवर दरोडा टाकून ग्राहकांनी ठेवलेले सर्वच दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी हारुगेरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा  

Back to top button