नाशिक : दिंडोरीत कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेले 12 जनावरांची सोडवणूक | पुढारी

नाशिक : दिंडोरीत कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेले 12 जनावरांची सोडवणूक

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील उमराळे खुर्द येथे दिंडोरी पोलिसांच्या धडक कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १२ जनावरांची सोडवणूक  करण्यात आले आहे.

तालुक्यातील उमराळे खुर्द येथे संशयित आरोपी सुभाष शार्दुल यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचे १२ जनावरे डांबून ठेवण्यात आली होती. तसेच तीन जनावरे महिंद्रा पिकप या वाहनात अवैधरित्या वाहतूक करणार असल्याचीही गोपनीय माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली. दिंडोरी पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी छापा टाकत बारा जनावरे व जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन जप्त केले. याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करीत जनावरांची सोडवणूक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस हवालदार तुळशीराम जाधव, पोलीस नाईक प्रसाद सहाने, पोलीस नाईक सुदाम धुमाळ, पोलीस नाईक संदीप कडाळे, पोलीस शिपाई मधुकर बेंडकुळी, पोलीस शिपाई अविनाश आहेर, पोलीस चालक निवृत्ती फड यांचे पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे हे करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button