मास्‍कबाबत आरोग्‍यमंत्री टोपेंचे मोठे विधान, “ज्‍या जिल्‍ह्यात रुग्‍णसंख्‍या..” | पुढारी

मास्‍कबाबत आरोग्‍यमंत्री टोपेंचे मोठे विधान, "ज्‍या जिल्‍ह्यात रुग्‍णसंख्‍या.."

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ज्या जिल्ह्यांमध्ये दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी मास्कचा वापरही करायला हवा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरीही रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण घटले असल्याचेही त्‍यांनी माध्‍यमांशी बाेलताना सांगितले.

 यावेळी टाेपे म्‍हणाले की, राज्‍यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्‍याचे चित्र आहे. येथील नागरिकांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. राज्‍यात काेठेही मास्‍कची सक्‍ती नाही. मात्र काेराेना रुग्‍णसंख्‍या वाढणार्‍या जिल्‍ह्यात नागरिकांनी प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून मास्कचा वापर करायला सुरूवात करावी. सध्या तरी राज्‍यातील कोरोना परिस्‍थिती नियंत्रणात असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काही महत्त्‍वाच्‍या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी सांगितले.

राज्‍यात शनिवारी कोरोनाचे ५२९ रूग्ण आढळले हाेते. महाराष्ट्रातील मास्क सक्ती एप्रिल महिन्यात हटवण्यात आली होती.

हेही वाचलंत का?

Back to top button