पुढारी ऑनलाईन डेस्क :
एक ६६ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवले. यानंतर दहा मिनिटांमध्येच त्यांचा स्मृतिभ्रंश झाला, अशी माहिती आयरिश मेडिकल जर्नलमधील एक रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. पत्नीबरोबरील शरीरसंबंधानंतर संबंधित व्यक्तीला 'शॉर्ट-टर्म मेमोरी लॉस'च्या ( Irish Man Loses Memory ) आजाराला सामोरे जावे लागले आहे. मागील ४८ तासांमधील सर्व गोष्टीचा त्याला विसर पडला असल्याचे संशोधकांनी अहवालात नमूद केले आहे.
यासंदर्भात आर्यलंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल लिमरिकच्या न्युरोलॉजी डिपार्टमेंटने म्हटलं आहे की, सेक्समुळे स्मृतीभ्रंशाचा धोका होवू शकतो. विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वीही संबंधित व्यक्तीला सेक्स केल्यानंतरच स्मृतीभ्रंशाचा त्रास झाला होता.
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, स्मृतीभ्रंश होण्यापूर्वी संबंधित ६६ वर्षीय व्यक्तीने १० मिनिटे आधी आपल्या पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवले होते. यानंतर त्यांना त्रास सुरु झाला. आपण आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरलो, असे त्यांना वाटू लागले. वास्तविक एक दिवस आधीच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला होता. तरीही त्यांना आपण वाढदिवस साजरा केला याचे स्मरण झाले नाही. पत्नीबरोबरील शरीरसंबंधानंतर संबंधित व्यक्तीला 'शॉर्ट-टर्म मेमोरी लॉस'च्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. मागील ४८ तासांमधील सर्व गोष्टीचा त्याला विसर पडला असल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे.
संशोधक या नवीन शारीरिक त्रासाला जुन्या आजारांशी जोडत आहेत. संशोधकांच्या मते ५० ते ७० वयोगटातील व्यक्तींना असा त्रास होण्याचा धोका असू शकतो. 'शॉर्ट-टर्म मेमोरी लॉस' आजार केवळ शरीरसंबंध ठेवल्यानेच होता असे नाही तर डोकेदुखी, अति व्यायाम, अति गरम व अति थंड पाण्याचा वापर, ताण-तणाव, शारीरिक वेदना यामुळेही हा त्रास होण्याचा धोका असतो. ५० ते ६० वयोगटातील पुरुषांना याचा त्रास होण्याचा धोका अधिक असतो. मात्र हे वारंवार होत नाही, असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :