पुढारी ऑनलाईन; लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित 'सरसेनापती हंबीरराव' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. यानंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी दस्तक देत चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. याच दरम्यान मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या आजी- आजोबांनी चित्रपटाचा मनमुराद आनंद घेतला.
प्राजक्ता माळीच्या रानबाजार बेवसीरिजमधील बोल्डसीनने खूपच चर्चेत आली होती. तर सध्या तिने आपल्या लाडक्या आजी- आजोबासोबत 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपट पाहण्याचा मनमुराद आनंद घेतला. प्राजक्ताने नुकताच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केल्याने याचा खुलासा झाला आहे. या फोटोत प्राजक्ता टिशर्ट आणि जीन्समध्ये तर आजी – आजोबा मराठमोळा लूकमध्ये आनंदीत दिसले आहेत. या फोटोला तिने भल्ली मोठी कॅप्शन लिहिली आहे.
यात तिने 'A day with "आजी-आजोबा" ?,आणि आम्ही "सरसेनापती हंबीरराव" पाहिला. ?, कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट♥️.प्रविण दादा तू भारी आहेस- विषय कट?. २.३० तासात तू २ महाराजांची, त्यांच्या सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट; ज्या हुशारीनं दाखवलीस त्याला तोडच नाही. तुझ्यातला प्रेमळ, समंजस, दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला आणि त्यानी आम्हांला कितीतरी शिकवलं. त्यासाठी किती धन्यवाद देऊ? #केवळप्रेम. नेहमीप्रमाणे कडक कामगिरी. मोहिम यशस्वी???आजी- आजोबा एकदम खूष ?. ' असे म्हटलं आहे. याशिवाय तिने प्रत्येक मराठी माणसाने 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपट पाहिला पाहिजे असा सल्लाही दिला आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'Beautiful ?', 'खूप छान… ❤️तुझे आजी आजोबा', 'Kupch bhari ahe.. हंबीरराव..??', '?? मस्त?? ❤️❤️❤️ प्राजक्ता❤️❤️❤️', 'आजींची स्माईल झकास आहे ! ???', 'खरच अप्रतिम चित्रपट आहे.. ?', 'प्रवीण तरडे मराठी सिनेसृष्टीतला मांजरेकरांनंतर बापमाणूस आहे खरोखर??????', 'जय भवानी ? जय शिवाजी..? ?जय् महाराष्ट्र?'. यासारख्या अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.
याआधी चित्रपटाबद्दल अभिनेता कुशल बद्रिकेने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यात त्याने "सरसेनापती हंबीरराव' एक दैदीप्यमान चित्रपट आहे. एखादे ऐतिहासिक पुस्तक वाचताना, आपल्या डोळ्यांसमोर काही चित्र उभी राहतात तसेच यावेळी होते. काही प्रसंग तर चक्क डोळ्यासमोर तरंगू लागतात. हा चित्रपट आपल्याला इतिहासात घेऊन जातो. आपण आपलं अस्तित्व विसरून इतिहास जगू लागतो, त्या लढायांमध्ये एखादी तलवार हाती घेऊन आपणही स्वराज्यासाठी शत्रूचा शह द्यावा असे वाटते. प्रवीण तरडे मित्राचा कायम ऋणी राहीन.' असे त्याने म्हटले आहे.
'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडे यांनी साकारली आहे. चित्रपटातील रोखठोक संवाद आणि जबरदस्त अॅक्शनमुळे चाहते कौतुक करत आहेत.
हेही वाचलंत का?