औरंगाबाद : कॅनॉलमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह ; आत्महत्या की घातपात, पैठण पोलिसाचा तपास सुरू…. | पुढारी

औरंगाबाद : कॅनॉलमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह ; आत्महत्या की घातपात, पैठण पोलिसाचा तपास सुरू....

पैठण ; पुढारी वृत्तसेवा

पैठण तालुक्यातील इंदेगाव शिवार परिसरातील कॅनॉलच्या पाण्यामध्ये अनोळखी ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाचा घातपात झाला आहे की, त्याने आत्महत्या केली यासंदर्भात पैठण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील इंदेगाव शिवार परिसरातील कॅनॉलच्या वाहत्या पाण्यामध्ये मृतदेह तरंगत असल्याची माहिती येथील गावकऱ्यांनी शनिवारी रात्री  पैठण पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, बीट जमादार, विठ्ठल एडके, शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी कॅनॉलच्या पाण्यामध्ये तरंगत असलेला मृतदेह  गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढला.

मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयातच मृतदेह ठेवण्यात आला आहे. सदर इसमाच्या अंगात पांढरा रंगाचा शर्ट, काळसर रंगाची पॅन्ट असून, खिशामध्ये चावीचे किचन (क्र. १०५) व हातामध्ये लाल रंगाचा दोरा बांधलेला आहे. या तरुणाने आत्महत्या केली की, याचा घातपात करण्यात आला, याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संबंधित व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास पैठण पोलिसांची संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी सतीश भोसले यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button