पुणे : धक्कादायक ! दिव्यांग मुलाला बरे करतो म्हणत मांत्रिकाकडून बलात्काराचा प्रयत्न, हडपसर येथील प्रकार | पुढारी

पुणे : धक्कादायक ! दिव्यांग मुलाला बरे करतो म्हणत मांत्रिकाकडून बलात्काराचा प्रयत्न, हडपसर येथील प्रकार

दिव्यांग मुलाचे आरोग्य चांगले करतो आणि पतीची आर्थिक परिस्थितीत सुधार होण्याकरिता एका मांत्रिकाने वेगवेगळे अंधश्रद्धा पसरवणा -या विधी करत, पीडित महिलेचा विनयभंग करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यानंतर पोलिसांनी मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत.

मांत्रिक धनंजय गोहाड उर्फ नाना ( रा.मांजरी बुद्रुक ) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे, तर शिष्या सुरेखा जमदाडे ( रा.गंगा नगर, फुरसुंगी ) ही फरार आहे. ही घटना जानेवारी २०२१ ते २६ मे २०२२ दरम्यान घडली. याप्रकरणी मंत्रिकासह त्याला मदत करणाऱ्या महिला शिष्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा, विनयभंग व बलात्कार करण्याचा प्रयत्न, विनयभंग, अपहार, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली : तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

याप्रकरणी पीडित छत्तीस वर्षाच्या महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा दिव्यांग मुलगा आहे. यांचे आरोग्य चांगले होईल आणि पतीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुरेखा जमदाडे यांनी मांत्रिक धनंजय गोहाड ( नाना) यांच्याशी भेट घालून दिली होती.

त्यावेळी दिव्यांग मुलाला दर मंगळवारी कडूनिंबाच्या पाल्याने आंघोळ घालायची, अकरा सोमवार दूध भात एकत्र शिजवून त्याचे लेपन पिंडीला करायचे, मुलावर दर पौर्णिमेला नारळ लिंबू उतरून बाहेर टाकायचे व काळी भावली दरवाजाला बांधायची तसेच शनिवारी दही, भात, उडीदाची काळी डाळ, गुलाल हे मुलाच्या अंगावर उतरून बाहेर टाकायचे हे उपाय मांत्रिकाने सांगितले.

Nepal Plane Missing : नेपाळमध्ये 22 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता!, 4 भारतीयांचा समावेश

मांत्रिक आणि साथीदार एवढ्यावरच थांबले नाही. फिर्यादीच्या विश्वासाचा गैर फायदा घेत एप्रिल २०२२ मध्ये घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढण्याचा बहाण्याने फिर्यादी महिलेच्या घरी येऊन विधी करावे लागेल असे सागितले. तेव्हा मांत्रिकाने घरी जाऊन महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून आरोपी सुरेखा जमदाडे हिने रक्तचंदना मध्ये लिंबू पिळून तयार केलेला लेप महिलेच्या सर्व अंगाला लावला. यानंतर मांत्रिकाने पीडित महिलेचा विनयभंग करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादीच्या मुलाचे आरोग्य चांगले व्हावे व पतीची आर्थिक परिस्थिती सुधारावी तसेच त्यांच्या मधील नकारात्मक शक्ती निघून जावी यामुळे आरोपीवर विश्वास ठेवून मांत्रिकाच्या सूचनेचे प्रमाणे सर्व करीत होती. त्यावेळी देखील त्यांनी फिर्यादीला पतीला याबाबतचे काही सांगू नको, नाहीतर तो मरण पावेल तसेच पहिल्या मुलाप्रमाणेच दुसरा मुलगा देखील दिव्यांग होईल.

बाहेर पाटी स्पा सेंटरची ! आत मात्र सुरु होता भलताच प्रकार, वाचा सविस्तर

तुझा संसार उध्वस्त होईल. तसेच याबाबत भावाला सांगितले तर त्याचा अपघात होईल. अशी भीती मांत्रिकाने पीडित महिलेला घातली होती. मात्र पीडित महिलेला मांत्रिक बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घालून तक्रार दिली. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे.

विकृतीचा कळस

संशयित आरोपी जमदाडे याने फिर्यादी महिलेच्या मोबाईलच्या व्हाट्सअपवर मॅसेज करून त्याचे वीर्य किती शक्तिशाली आहे. ते शरीरात घे म्हणत अमृत म्हणून प्राशन कर असे मेसेज पाठवून नंतर ते फोटो डिलीट करण्यास सांगितले. याबाबत कोणाला सांगितल्यास घरच्यांच्या मृत्यू होईल अशी भीती दाखवत विकृतीचा कळस गाठला.

Back to top button