नाशिक : द्राक्ष व्यापाऱ्याचे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी ; लाखोंचे नुकसान | पुढारी

नाशिक : द्राक्ष व्यापाऱ्याचे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी ; लाखोंचे नुकसान

नाशिक (गोंदेगाव) : पुढारी वृत्तसेवा.

निफाड तालुक्यातील मानोरी फाटा येथील द्राक्ष व्यापारी संदीप डुकरे यांच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या लक्षात ही बाबत आल्याने त्यांनी संदीप डुकरे यांना गोडाऊनला आग लागल्याचे कळविले.

मध्यरात्री ही आग लागल्याची शक्यता आहे. शॉर्ट सर्किटचे कारण सांगितले जात आहे. या आगीत व्यापाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिंपळगाव, कोपरगाव, येवला येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. द्राक्ष क्रेट आणि पॅकिंग पुठ्ठे यांची साठवणूक या गोदामात असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अठरा हजार क्रेट, पॅकिंग टेप, पुठ्ठे, वजनकाटे, एक मोटारसायकल आदी साहित्य जळून खाक झाले आहे. अंदाजे वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या आगीत कॅरेट- १८००० नग- ‘किंमत – १,५०,००००रु /-., पुट्टे- ५५०० नग- ४,५०,००००/-
रद्दी- २,००,०००/-, वजन काटा- १५ नग – किमंत- ७५,०००/-, मोटारसायकल- ५०,०००,
इतर- १०,०००००/- जळून खाक झाल्याची माहिती व्यापारी डुकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button