पुणे : रजा पाहिजे?… भेटा थेट आरोग्यप्रमुखांना | पुढारी

पुणे : रजा पाहिजे?... भेटा थेट आरोग्यप्रमुखांना

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना रजा अथवा सुटी घ्यायची असेल, तर आता थेट आरोग्यप्रमुखांची परवानगी घ्यावी लागत आहे. स्वत: आरोग्यप्रमुख आशिष भारती यांनीच हा फतवा काढला असून, रजांसाठी आरोग्यप्रमुखांनाच भेटावे लागत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.

देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर, अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

पुणे महापालिकेची शहरात दोन रुग्णालये, 18 प्रसतिगृहे, 70 दवाखाने अशी मोठी यंत्रणा आहे. जवळपास हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांना आता रजा हवी असेल, त्यासाठी थेट आरोग्यप्रमुख भारती यांच्याकडे अर्ज करून परवानगी घ्यावी लागत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हा नवा पायंडा पडला आहे. विशेष म्हणजे, आरोग्यप्रमुखांच्या परवानगीआधी आरोग्य विभागाचे प्रशासन अधिकारी, उपअधीक्षक, त्यानंतर वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी यांची संबंधित रजेच्या अर्जावर स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर त्यावर आरोग्यप्रमुखांची स्वाक्षरी होते.

‘सिंचन’ची आऊटसोर्सिंगमध्ये बनवेगिरी

या नव्या पायंड्यामुळे पालिकेच्या उपनगरांमधील दवाखान्यात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना रजा घ्यायची असेल, तर थेट महापालिकेत यावे लागत आहे. त्याचा थेट परिणाम दवाखान्यातील कामकाजांवर होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, आरोग्याच्या वर्ग 1 पासून अगदी चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांसाठी ही रजेची अट बंधनकारक करण्यात आली आहे. यापूर्वी कर्मचार्‍यांना स्थानिक पातळीवर रजा मिळत होती. मात्र, आता पालिकेत हेलपाटे मारावे लागत असल्याने कर्मचारीवर्गात नाराजी पसरली आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर

आरोग्य विभागातील काही कर्मचारी थेट एक-एक, दोन-दोन महिने परस्पर रजेवर जातात. किरकोळ स्वरूपाच्या रजा स्थानिक पातळीवर दिल्या जातात. पण, मोठ्या स्वरूपाच्या रजांमुळे आरोग्य विभागाच्या यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेऊन ही पद्धत सुरू करण्यात आली आहे.

– डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख

Back to top button