मनसेनं केलेले ट्विट अराजकीय, राजकारणाशी कोणताही संबंध नाही : गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील | पुढारी

मनसेनं केलेले ट्विट अराजकीय, राजकारणाशी कोणताही संबंध नाही : गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

मुंबई ऑनलाईन : मनसेने ट्विट केलेल्या फोटोवर गृहमंत्र्यांनी प्रथमच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील म्हणाले, मनसेचे ट्विट केलेला फोटो हा अराजकीय आहे. तो एका कुस्तीतील कार्यक्रमाचा फोटो असून, या फोटोचा राजकीय काही एक संबंध नाही. पवार बृजभूषण यांच्या फोटोचा राजकीय कोणताही संबंध नाही.

किरीट सोमय्यांनी २६/११ झालेल्या हल्ल्यात अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट हे बोगस असल्याचे म्हणत महाविकास आघाडीवर  पुन्हा नवा आरोप केला आहे. याबद्दल बोलताना गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, बुलेटप्रूफ जॅकेटबद्दल सोमय्यांनी केलेला आरोप हा गंमतीशीर आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नवाब मलिक यांच्यावरील कारवाईवर बोलताना ते म्हणाले, मंत्री मलिक यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मलिकांवर केलेले सर्व आरोप हे खोटे आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button