नाशिक : अवैध गॅसविक्री, गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखा; रायुकाँने दिला आंदोलनाचा इशारा

सिडको : वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांना निवेदन देताना राहुल कमानकर, मुकेश शेवाळे, कृष्णा काळे, संतोष भुजबळ आदी.
सिडको : वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांना निवेदन देताना राहुल कमानकर, मुकेश शेवाळे, कृष्णा काळे, संतोष भुजबळ आदी.

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
सिडको, अंबड परिसरातील काही भागात सुरू असलेल्या अवैध गॅसविक्री भरणा, गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांना दिले.

रायुकाँचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कमानकर, मुकेश शेवाळे यांच्या शिष्टमंडळाने देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनानुसार, अत्यंत ज्वलंत आणि धोकादायक असलेल्या एलपीजी गॅसचा सार्वजनिक ठिकाणी खुलेआम काळाबाजार आणि भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सिडकोतील खंडेराव चौक, पंडितनगर येथील मच्छी मार्केट, अंबड गाव बसस्थानकाच्या बाजूला संजीवनगर आदी ठिकाणी मोटारींसाठी गॅस रिफिलिंग सर्रास करण्यात येते. भरचौकात रहिवाशांचा वावर असणार्‍या परिसरात हा अवैध व्यवसाय केला जातो. त्यामुळे विस्फोट झाला, तर मोठी दुर्घटना घडून मोठी जीवितहानी होऊ शकते. तरी हा व्यवसाय चालविणार्‍यांवर कडक कारवाई करावी अन्यथा रायुकाँ तीव— आंदोलन करेल, असा इशारा दिला. यावेळी कृष्णा काळे, संतोष भुजबळ, हर्षल चव्हाण, विकी डहाळे, नितीन अमृतकर, सुनील घुगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news