रायगड : कशेडी घाटात आयशर टेम्पो - कंटेनरची समोरासमोर धडक; एक जण किरकोळ जखमी | पुढारी

रायगड : कशेडी घाटात आयशर टेम्पो - कंटेनरची समोरासमोर धडक; एक जण किरकोळ जखमी

रायगड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आयशर टेम्पो व कंटेनर यांच्यात समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात आयशर टेम्पो चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी सात वाजताच्या सुमारास भोगाव येलंगेवाडी गाव घडलेली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई बाजूकडून रत्नागिरी दिशेने जाणारा कंटेनर (क्र. एम एच ४६ बी २८०५) व चिपळूनकडून मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो (क्र. यू पी २३ ए टी ३०१६) यांच्या एका अवघड वळणावर समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात आयशर टेम्पो चालक बाबूराम सुखीराम (वय ३९) हा किरकोळ जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना समजतात सहाय्यक फौजदार सुर्वे पोलीस हवालदार कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत, मदत करत जखमी चालकास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button