नाशिक : 22 वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या | पुढारी

नाशिक : 22 वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

नाशिक : प्रमोद महाजन उद्यानाजवळील ओम शुभम अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या 22 वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. प्रियंका सुरेश खैरनार (22) असे या तरुणीचे नाव आहे. प्रियंकाने शनिवारी (दि. 21) सकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button