आई-वडील पाठीमागून येत आहेत, सोनसाखळी खरेदी करायची म्हणत खूप वेळ दुकानात थांबला; शेवटी सुऱ्याने… | पुढारी

आई-वडील पाठीमागून येत आहेत, सोनसाखळी खरेदी करायची म्हणत खूप वेळ दुकानात थांबला; शेवटी सुऱ्याने...

पुणेः पुढारी वृत्तसेवा: सोनसाखळी खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केल्यानंतर, सुर्‍याने सराफ व्यवसायिकावर हल्ला करून जबरी चोरीचा प्रयत्न करणार्‍या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गौरव विजय रायकर (वय. 25,रा. धायरी) असे त्याचे नाव आहे. गुरूवारी १९ मे रोजी दुपारी पावने पाच वाजताच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथील वैभवलक्ष्मी ज्वेलर्समध्ये ही घटना घडली होती. चोरट्याच्या हल्ल्यात विनोदकुमार सोनी (वय.42,रा. आंबेगाव खुर्द) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आझम खान 27 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर, तीन दिवसात मुख्यमंत्री योगींना भिडणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांचे आंबेगाव खुर्द येथील पृथ्वीराज हाईटस् या इमारतीत वैभवलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आरोपी रायकर हा त्यांच्या दुकानात आला होता. आई-वडील पाठीमागून येत आहेत, मला सोनसाखळी खरेदी करायची आहे असे सोनी यांना सांगितले. त्यामुळे तो खूप वेळ दुकानात बसून होता. शेवटी जेवणाची वेळ झाल्यामुळे सोनी यांनी दुकान बंद केले. तेव्हा रायकर हा दुकानातून निघून गेला होता. त्यानंतर परत तो पावणे पाच वाजताच्या सुमारास सोनी यांच्या दुकानात आला.

भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही : हार्दिक पटेल

त्यावेळी देखील त्याने पहिलेच कारण सांगून दुकानात बसला. सोनी यांना वाटले की, खरोखर त्याच्या घरचे कोणीतरी येत असावे म्हणून त्यांनी परत रायकर याला बसण्यास सांगितले. यावेळी रायकर याने तुम्ही सोने कसे देता, पैसे रोख की ऑनलाईन घेणार अशी विचारणा करून थेट पिशवीतून सुरा काढून त्यांच्यावर हल्ला करत दागिणे चोरीचा प्रयत्न केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत सोनी यांनी रायकर याचा प्रतिकार करण्यास सुरूवात केली. दोघांत झटापट सुरू झाली. सोनी यांच्या प्रतिकारापुढे निभाव लागत नसल्याचे पाहून रायकर याने तेथून पळ काढला. झटापटीत सोनी यांच्या कपाळावर सुर्‍याची जखम झाली आहे. हा प्रकार सुरू असताना बाहेर काही नागरिक देखील होते. मात्र त्यांनी थोडे देखील धाडस दाखविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे रायकर दुचाकीवर बसून फरार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला पकडण्याच्या सुचना तपास पथकाला केल्या होत्या. त्यानुसार पथकाने रायकर याला ताब्यात घेतले.

हेही वाचा:

Simon Taufel : सायमन टॉफेल यांनी सुरू केला ऑनलाइन अंपायरिंगचा कोर्स!

Aishwarya in Cannes : उगाचं ऐश्वर्याला सर्वात सुंदर स्त्री म्हणत नाहीत!

मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये यांचे निधन

Back to top button