

पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आणि भाऊ असा परिवार आहे.
लिमये यांना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत दोन दिवसांपूर्वी महामेट्रोने आयोजित केलेल्या बैठकीतही त्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही लिमये यांची ओळख होती.
हे ही वाचा: