हत्ती आला, पळा पळा! आजरा, गडहिंग्लज मार्गावर वाहनधारकांची उडाली धांदल
आजरा; पुढारी वृत्तसेवा : आजरा आणि गडहिंग्लज राज्य मार्गावर हत्ती आल्याने नागरीकांची आणि वाहन धारकांची एकच धांदल उडाली. हा हत्ती वाट चुकल्याने पश्चिम भागातील सोहाळे, चांदेवाडी मार्गे शिरसंगी येथे जाऊन ऊस भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे.
हत्तीच्या ज्या भागात जाणार आहे त्या भागात परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने तैनात केले आहे.
- टेटर फंडिंग केस : जम्मू -काश्मीरमध्ये ‘एनआयए’चे १४ जिल्ह्यांत ४५ ठिकाणी छापे
- tokyo olympic medal : ऑलिम्पिक पदकवीरांवर बक्षिसांची लयलूट; राज्यांपासून उद्योगपतींपर्यंत हात सरसावले
दरम्यान वनविभागाने तो विचलीत होऊन कोणतीही जीवीत हाणी होऊ नये याची काळजी घेत आहे.
हत्तीला जंगलाच्या दिशेने हुसकावण्यासाठी योग्य उपाययोजना सुरू असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
काल (दि.०७) रात्रभर प्रवास करत आज सकाळी हिरलगे, खोराटवाडी, जाधेवाडी परिसरात आला.
- योगी आदित्यनाथ यांची सोशल मीडियावर टीका, कपिल सिब्बल यांचे प्रत्युत्तर
- अन्यथा मागास समाजात कास्ट नाही पण क्लास निर्माण होतील : देवेंद्र फडणवीस
पश्चिम भागात सध्या दोन हत्तींचे वास्तव्य असून हत्तींनी भात पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. चार दिवस शिरसंगी येथे भात व ऊस पिकाचे मोठे नुकसानीनंतर हत्ती काल (दि.०७) हाजगोळी परिसरात दाखल झाला.
हाजगोळी, पेद्रेवाडी येथेही बऱ्यापैकी नुकसान केल्यानंतर भादवण मार्गे थेट हिरलगे, खोराटवाडी असा प्रवास सध्या करत आहे.
या परिसरात जंगलांचा अभाव असल्यामुळे थेट खोराटवाडी- जाधववाडी मार्गावर खुलेआम शेतात फिरत होता.
आजरा- गडहिंग्लज या मुख्य मार्गावरवरून जाधववाडीच्या दिशेने कुच केला.
- बदलत चाललेली शिक्षण पद्धती अंगिकारण्याची तयारी ठेवा : कुलगुरू डॉ. अरुण पाटील
- शाळा (school) सुरू करण्याचा निर्णय, २५ जिल्ह्यांत १७ रोजी वाजणार घंटा
- व्हिडिओ न्यूड शूट करून मला गुप्तांग दाखवलं जाणार नाही असं सांगितलं, पण..
हे ही पाहा :