पुणे; पुढारी वृत्तसेवा : वंचितांमधील अतिवचिंताना आरक्षणाचा फायदा मिळायला हवा अन्यथा मागास समाजात कास्ट नाही पण क्लास निर्माण होतील, असे प्रतिपादन यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बहुजन समाजाची अवस्था पाहता खूप काळ हे आरक्षण योग्य पध्दतीने राबवावे लागणार आहे. अजूनही समाजाचा मोठा घटक आरक्षणापासून दूर आहे. या वचिंत समाजाला आरक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.
रामभाऊ म्हाळगी आयोजित पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गिरीश प्रभूणे, पोपटराव पवार, सय्यद वैद, नामदेव कांबळे, सरस्वती सन्मान विजेते शरदकुमार लिंबाले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मोदी सरकारने पद्म पुरस्काराचे निकष बदलले आहेत. पद्मश्री पुरस्कार हा सर्वोच्च नागरीो पुरस्कार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराची पद्धत बदलली आहे. आतापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळाले ते देशातील पदम् होतेच पण, जमिनीवर काम करणारी, सामान्य माणसांमध्ये काम करणारी, फारशी प्रसिध्दीच्या जोतात न येणारी मंडळी पुरस्कारापासून वंचित राहिली होते. यापैकी कोणीही पुरस्कारसाठी काम करत नव्हते पण, समाचाचे हे कर्तव्य होते की अशा लोकांनाही हा पुरस्कार दिला पाहिजे. कारण हा पुरस्काराच्या माध्यामातून समाजाला चांगल काम करण्याची प्रेरणा मिळते. आता सरकार नाही तर समाज सुचवेल कोणाला पुरस्कार दिला पाहिजे. आता अशा व्यक्तींना पुरस्कार मिळत आहे."
हे ही वाचलं का?
https://youtu.be/KbUVeiVBAdY