योगी आदित्‍यनाथ यांची सोशल मीडियावर टीका, कपिल सिब्‍बल यांचे प्रत्‍युत्तर | पुढारी

योगी आदित्‍यनाथ यांची सोशल मीडियावर टीका, कपिल सिब्‍बल यांचे प्रत्‍युत्तर

नवी दिल्‍ली; पुढारी वृत्तसेवा :  उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री याेगी आदित्‍यनाथ यांनी साेशल मीडियावर टीका केली.  सोशल मीडिया हा एक ‘अनियंत्रित घोडा’ असल्‍याचे याेगी आदित्‍यनाथ म्‍हटलं आहे. या टीकेला प्रत्‍युत्तर देत उत्तर प्रदेश हाच ‘अनियंत्रित प्रदेश’ असल्‍याचे काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते कपिल सिब्‍बल यांनी म्‍हटलं आहे.

लखनौमध्‍ये भाजपच्‍या आयटी सेल कार्यकर्ते प्रशिक्षण शिबिरात बोलताना आदित्‍यनाथ म्‍हणाले की, सोशल मीडियाची नैतिक जबाबदारी कोणावरही नाही.

सद्‍यस्‍थितीमध्‍ये सोशल मीडिया हा एक ‘अनियंत्रित घोडा’ आहे. या घोड्याला नियंत्रित करण्‍यासाठी प्रशिक्षण आणि तयारीची गरज आहे.

कार्यकर्त्यांनी काळजी घेतली नाही तर सोशल मीडियावर तुम्‍ही टीकेचे धनी होवू शकता, असा इशाराही त्‍यांनी दिला.

पेगासन हेरगिरी प्रकरणी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उत्तर देण्‍यासाठी सज्‍ज रहावे. यासाठी कोणत्‍याही मुहूर्ताची वाट पाहू नका, असा सल्‍लाही त्‍यांनी दिली.

कपिल सिब्‍बल यांचा पलटवार

आदित्‍यनाथ यांनी सोशल मीडियाला टार्गेट केल्‍यानंतर याची दखल काँग्रेस पक्षाने घेतली.

पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते कपिल सिब्‍बल यांनी सवाल केला की, भारतातील कोणते राज्‍य ‘अनियंत्रित’ आहे. हे स्‍पष्‍ट करा आणि त्‍या राज्‍यावर नियंत्रण आणण्‍यासाठी तयारी करा, असे आवाहनही सिब्‍बल यांनी केले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पुढील वर्षी हाेणार आहेत. भाजपने पुन्‍हा सत्ता काबीज करण्‍यासाठी तयारी सुरु केली आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :बटर चिकनची ही रेसीपी खास तुमच्यासाठी 

 

 

Back to top button