अर्थसंकल्प शॉर्टटर्म  ट्रेंड इंडिकेटर  | पुढारी | पुढारी

अर्थसंकल्प शॉर्टटर्म  ट्रेंड इंडिकेटर  | पुढारी

भूषण गोडबोले

मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 36050 अंकाला तसेच निफ्टी 11069 अंकाला बंद झाला.सप्ताहअखेर शुक्रवारी सेन्सेक्सने 111 अंकांची अंकांची तसेच निफ्टीने 16 अंकांची मंदी दर्शवली. साप्ताहिक आलेखानुसार निर्देशांक करेक्टिव्ह कन्सॉलिडेशन म्हणजेच तेजीनंतर मर्यादित पातळ्यांमधे चढ-उतार  दर्शवत आहे. अल्पावधीच्या आलेखानुसार आगामी कालावधीसाठी सेन्सेक्सची 34701 तसेच निफ्टीची 10667 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. आगामी आठवड्यात अर्थमंत्री अरुण जेटली देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील.

अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर निर्देशांकात मोठ्या प्रमाणात हालचाल होणे अपेक्षित आहे. यामुळे अल्पावधीसाठी अर्थसंकल्प शॉर्टटर्म ट्रेंड इंडिकेटर म्हणजेच अल्पावधीसाठी दिशा दर्शकाचे काम करेल. पुढील आठवड्यात अर्थसंकल्पाबरोबर  रेल्वे बजेटदेखील जाहीर होणार असल्याने टी डब्लू एल, टेक्स रेल इत्यादी कंपन्यांच्या शेअर्समध्येदेखील मोठ्या प्रमाणात हालचाल होणे अपेक्षित आहे. यामुळे आगामी कालावधीमध्ये रेल्वे बजेटशी निगडित असलेल्या कंपनांच्या शेअर्सने मंदीचा कल दर्शवल्यास  मर्यादित धोका स्वीकारून स्टॉप लॉस तंत्राचा वापर करून मंदीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकेल.

निफ्टी तसेच सेन्सेक्सचा विचार करता सद्य परिस्थितीमधे निफ्टीचे मूलभूत किंमत उत्पादन गुणोत्तर 27 पेक्षा जास्त असल्याने तसेच साप्ताहिक आलेखानुसार निर्देशांक करेक्टिव्ह कन्सॉलिडेशन म्हणजेच तेजीनंतर मर्यादित पातळ्यांमधे चढ-उतार दर्शवत असल्याने जोपर्यंत सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत गुंतवणूकदारांनी संयम बाळगणे योग्य ठरेल.  

 (सेबी रजिस्टर्ड गुतंवतणूक सल्लागार)
 

Back to top button