Stock Market Closing Bell | नवीन उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स- निफ्टी सपाट बंद | पुढारी

Stock Market Closing Bell | नवीन उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स- निफ्टी सपाट बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) शुक्रवारी (दि. २४) नवा उच्चांक विक्रमी नोंदवला. पण त्यानंतरच्या चढ-उतारानंतर दोन्ही निर्देशांक सपाट बंद झाले. सेन्सेक्स ७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७५,४१० वर बंद झाला. तर निफ्टी १० अंकांनी घसरून २२,९५७ च्या सपाट पातळीवर स्थिरावला. बीएसई मिडकॅप ०.२ टक्क्यांनी वाढून बंद झाला. तर स्मॉलकॅप ०.२ टक्क्यांनी घसरला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात लवकर कपात होणार नसल्याचे संकेत दिल्याने आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सकाळच्या व्यवहारात निफ्टीने ५० निर्देशांकाने २३ हजारांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. तर सेन्सेक्सने ७५,६३६ चे नवे शिखर गाठले होते. त्यानंतर बाजारात चढ-उतार दिसून आला.

कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्स आज ७५,३३५ अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ७५,६३६ चा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. त्यानंतर त्याने ७५,४०० च्या पातळीवर व्यवहार केला. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एलटी, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी हे शेअर्स वाढले. तर आयटीसी, एम अँड एम, टीसीएस, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, सन फार्मा हे शेअर्स घसरले.

Sensex closing
Sensex closing

निफ्टी २२,९३० वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने २३,०२६ चा नवा उच्चांक नोंदवला. निफ्टीवर एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, बीपीसीएल, एलटी, अल्ट्राटेक सिमेंट हे तेजीत राहिले. तर अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील आणि टायटन हे शेअर्स घसरले.

क्षेत्रीय पातळीवर काय स्थिती?

बाजाराला आज नवे शिखर गाठण्यास बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समधील तेजीचा सपोर्ट मिळाला. तर FMCG, रियल्टी आणि फार्मा शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टी एफएमसीजी, मेटल, फार्मा, रियल्टी आणि ऑइल अँड गॅस लाल रंगात बंद झाले. तर निफ्टी बँक, ऑटो, मीडिया आणि ऑइल अँड गॅस वाढून बंद झाले.

हे ही वाचा :

 

Back to top button