Stock Market Updates | विक्रमी उच्चांकानंतर सेन्सेक्स- निफ्टी सपाट, कोणते शेअर्स तेजीत? | पुढारी

Stock Market Updates | विक्रमी उच्चांकानंतर सेन्सेक्स- निफ्टी सपाट, कोणते शेअर्स तेजीत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) शुक्रवारी (दि. २४) नवा उच्चांक विक्रमी नोंदवला. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक सपाट झाले. सकाळच्या व्यवहारात निफ्टीने ५० निर्देशांकाने २३ हजारांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. तर सेन्सेक्सने ७५,५८२ चे नवे शिखर गाठले. त्यानंतर सेन्सेक्स १०० अंकांनी घसरून ७५,३०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी २२,९५० वर आला.

बाजाराला आज नवे शिखर गाठण्यास बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समधील तेजीचा सपोर्ट मिळाला. तर FMCG, रियल्टी आणि फार्मा शेअर्समध्ये घसरण दिसून आली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून लवकर व्याजदरात कपात होण्याची शक्यता नसूनही त्याचा भारतीय शेअर बाजारावर मोठा काही परिणाम दिसून आलेला नाही.

सेन्सेक्सवर एलटी, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, टाटा स्टील, विप्रो, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर टीसीएस, एम अँड एम, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टायटन, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button