IPL Playoff Ticket : प्लेऑफ सामन्यांसाठी तिकीट विक्री सुरू, जाणून घ्या किंमत | पुढारी

IPL Playoff Ticket : प्लेऑफ सामन्यांसाठी तिकीट विक्री सुरू, जाणून घ्या किंमत

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 आता हळूहळू शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्रुप स्टेजचे सामने 21 मे रोजी संपतील, त्यानंतर प्लेऑफचे सामने रंगणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटरचे सामने खेळवले जाणार आहे. त्यासाठी तिकीट विक्री सुरू झाली असून ही तिकिटे तुम्ही ऑनलाइन बुक करू शकता. चला तर जाणून घेऊया या सामन्यांची तिकीटे कितीला आहेत आणि ती कुठे बुक करू शकाल याबाबत… (IPL Playoff Ticket)

  • क्वालीफायर 1 : 24 मे (ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता)
  • एलिमिनेटर: 25 मे (ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता)

IPL 2022 चा क्वालिफायर 1 कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर 24 मे रोजी खेळवला जाईल. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर पोहोचणारे संघ या वेळी आमनेसामने असतील. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर गुणतालिकेत तिसरे आणि चौथ्या स्थानावरील संघ 25 मे रोजी भिडतील. एलिमिनेटर जिंकणारा संघ क्वालिफायर 1 गमावणाऱ्या संघाचा सामना करेल. हा सामना (क्वालिफायर 2) जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत क्वालिफायर 1 च्या विजेत्याशी सामना करेल. मात्र, क्वालिफायर 2 आणि फायनल गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. (IPL Playoff Ticket)

ईडन गार्डन्स सामन्यांसाठी तिकीटांची किंमत किती?

क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर इडन गार्डन्सवर खेळवला जाईल. इथे वेगवेगळ्या स्टँडच्या तिकीटाची किंमत वेगळी आहे. तिकिटांची किंमत 800 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत आहे. तिकिटांची 5 श्रेणींमध्ये विभागणी केली असून तिकिटांची किंमत 800, 1000, 1500, 2000 आणि 3000 रुपये आहे. (IPL Playoff Ticket)

तिकीट कसे बुक कराल.. (IPL Playoff Ticket)

तिकीट बुक करण्यासाठी, प्रथम बुक माय शो वर जा.
येथे स्पोर्ट्स कॅटेगरी वर क्लिक करा.
येथे क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटरचा पर्याय दिसेल.
तुम्हाला पहायचा असलेला सामना निवडा.
तुम्हाला प्रथम मोबाईल नंबर/ईमेलद्वारे पडताळणी करावी लागेल.
खाली तुम्हाला BOOK लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.
तुम्हाला बुक करायच्या असलेल्या तिकिटांची संख्या एंटर करा.
त्यानंतर तुम्हाला ज्या किंमतीचे तिकीट बुक करायचे आहे ते निवडा.

Back to top button