Sunil Gavaskar : धोनीच्या निवृत्तीवरून गावस्‍करांचे मोठे विधान, म्हणाले... - पुढारी

Sunil Gavaskar : धोनीच्या निवृत्तीवरून गावस्‍करांचे मोठे विधान, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sunil Gavaskar : आयपीएल 2022 (IPL 2022)च्या 59 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) पाच विकेट्सनी मात केली. या पराभवासह सीएसकेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या. त्यामुळे आयपीएल 2022 मधून बाहेर पडणारा मुंबईनंतर चेन्नई हा दुसरा संघ ठरला.

यापूर्वी आयपीएल 2021 मध्येही सीएसकेचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नव्हता. त्या काळातही धोनीच्या निवृत्तीने वातावरण चांगलेच तापले होते आणि आता सीएसके पुन्हा एकदा लीग स्टेजमधून बाहेर पडल्याने क्रिकेट वर्तृळात धोनीच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी धोनीच्या निवृत्तीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वास्तविक, त्यांचे हे वक्तव्य CSK vs MI या सामन्यानंतर आले आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने चेन्नईचा 5 गडी राखून पराभव केला. मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

चेन्नईचा संघ आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी धोनीने या हंगामात फिनिशरची भूमिका बजावली आहे. त्याने भले मोठी खेळी खेळली नसेल, पण त्याच्या छोट्या स्फोटक खेळीने चाहत्यांची मने जिंकली. त्याने मुंबईविरुद्ध 33 चेंडूत 36 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारही पाहायला मिळाले. दरम्यान, धोनीच्या निवृत्तीबाबत सट्टेबाजीचा बाजार तापला आहे. धोनी आयपीएलच्या या हंगामानंतर आयपीएलला बाय-बाय करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ज्यावर भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

गावस्कर म्हणाले, ‘हे बघा मुंबईविरुद्ध खिलाफ धोनीने कशी फलंदाजी केली. स्पष्टपणे हे दिसत आहे की, तो खुप उत्सुक आहे आणि आपल्या खेळाला घेऊन तो उत्साहित आहे. त्याचे रनिंग बिटविन द विकेट खूप चांगले आहे. याचाच अर्थ तो खूप उत्सुक होता. 2 किंवा 3 विकेट पडल्यावर लवकर दोनीला जी संधी मिळते त्याची त्याला जाणीव आहे. आम्ही धोनीला हे नियमितपणे करताना पाहिले आहे. याचा अर्थ धोनी निवृत्तीबाबतच्या अफवांकडे दुर्लक्षकरून आयपीएलमध्ये खेळत राहील. 2020 मध्ये जेव्हा त्याला निवृत्तीबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने खेळत राहीन हेच सांगितले होते.’

धोनी पुढेही खेळत राहील : सुनील गावस्कर

धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. आयपीएलचे कर्णधारपद सोडल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र पुन्हा कर्णधार झाल्यानंतर सर्व काही सामान्य झाले आहे.

धोनी जोपर्यंत आयपीएल खेळत आहे तोपर्यंत सीएसकेचे कर्णधारपद त्याच्याच हातीच राहणार हे निश्चित आहे. त्याचवेळी भारताचे माजी कर्णधार आणि सध्याचे तज्ज्ञ सुनील गावस्कर यांनी या विषयावर आपले मत मांडले आहे. धोनी आयपीएलमध्ये खेळत राहील, असा गावस्कर यांनी विश्वास व्यक्त केला आहे. या मोसमात त्याने अनेक मॅच विनिंग इनिंग खेळल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Back to top button