पिंपरी : त्रिसदस्यीय प्रभागरचनेला निवडणूक आयोगाची मंजुरी | पुढारी

पिंपरी : त्रिसदस्यीय प्रभागरचनेला निवडणूक आयोगाची मंजुरी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप आराखड्यास राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.12) मंजुरी दिली.

येत्या मंगळवारी (दि.17) प्रभागरचनेचा अंतिम आराखडा सर्व क्षेत्रीय कार्यालयासह महापालिका भवनात लावण्यात येणार आहेत. तसेच, पालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावरही आराखडा पाहता येणार आहे.

तर ओवेसीला औरंगजेबाकडे पाठवतो, नितेश राणेंचा गंभीर इशारा

महापालिकेने त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आला. त्यात तीन सदस्यांचे 45 व चार सदस्यांचा एक असे एकूण 46 प्रभाग आहेत.

एकूण 139 नगरसेवक संख्या आहे. त्या आराखड्यावर 14 फेबु्रवारीपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या. तब्बल 5 हजार 684 हरकती व सूचनांवर 25 फेब्रुवारीला प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांचा अहवाल 2 मार्चला राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात आला.

‘द काश्मीर फाईल्स’ नंतर पुन्हा दिसणार काश्मिरी पंडितांच्या व्यथा, नवा चित्रपट प्रदर्शनास सज्ज

ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी निवडणुकीसंदर्भातील निर्णयाचा अधिकार राज्य सरकारने अचानक स्वत:कडे घेतला. त्यामुळे प्रभागरचनेचे तसेच, निवडणुकीसंदर्भातील कामकाज जैसे थे ठप्प झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 मेच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भातील कामकाज पुन्हा सुरू केले.

त्यानुसार पालिकेने प्रभागरचनेचे कामकाज बुधवारी (दि.11) पूर्ण केले. प्रभागरचनेत किरकोळ बदल करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रभागरचनेच्या अंतिम आराखडा आयोगाचे आयुक्त युपीएस मदान यांच्यासमोर गुरुवारी सादर करण्यात आला.

चिमुकलीने मांजरीचे पिल्लू समजून बिबट्याचा बछडा आणला घरी

त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून, त्यास मंजुरी दिली आहे. तो अंतिम झालेला आराखडा मराठी व इंग्रजी भाषेत शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करून येत्या मंगळवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सर्व 8 क्षेत्रीय कार्यालय व पालिका भवनात प्रभागरचना व नकाशे लावले जाणार आहेत.

अंतिम प्रभागरचना नागरिकांसाठी प्रसिद्ध करणार

त्रिसदस्यीय प्रभागाचा प्रारूप आराखडा व नकाशे नागरिकांसाठी ज्या प्रमाणे सर्व क्षेत्रीय कार्यालय व पालिका भवनात लावण्यात आले. त्याप्रमाणेच अंतिम आराखडा येत्या मंगळवारी त्या सर्व ठिकाणी प्रसिद्ध केले जातील. त्यावर हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

कोर्टाकडून नवाब मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी

एकूण 46 प्रभाग

पिंपरी-चिंचवड शहरात तीन सदस्यांचे 45 प्रभाग आहेत तर, चार सदस्यांचा सांगवी प्रभाग क्रमांक 46 हा प्रभाग आहे. असे एकूण 46 प्रभाग आहेत. एकूण 139 नगरसेवक संख्या आहे. त्यातील एकूण 69 जागेवर महिलांचे आरक्षण असणार आहे. अनुसूचित जातीच्या 22 व अनुसूचित जमातीचे 3 जागा आहेत. तर, सर्वसाधारण खुल्या गटासाठी 114 जागा आहेत.

Back to top button