कोर्टाकडून नवाब मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी | पुढारी

कोर्टाकडून नवाब मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी

मुंबई, पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने त्यांना खासगी न्यायालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली आहे. यापूर्वीच मलिकांनी न्यायालयाला सांगितले होते की, राज्य संचालित रुग्णालयात योग्य उपचार केला जात नाही, त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मागणी केलेली होती.

विशेष न्यायालय पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिलेली आहे. मलिक न्यायालयात ताप आणि डायरियामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मलिकांविरोधात ५००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

२३ फेब्रुवारीला मनी लाॅन्ड्रिंग केसमध्ये मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आला होती आणि त्यांच्या ८ प्राॅपर्टीज जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कुर्ला येथील गोवा कम्पाऊंड, कुर्ला पश्चिममधील कमर्शियल इमारत, उस्मानाबादमधील १४८ एकर जमीन, कुर्ला वेस्टमधील ३ फ्लॅट आणि बांद्रा पश्चिममधील २ घरेदेखील आहेत.

पहा व्हिडीओ : संभाजीराजेंनी केली नव्या संघटनेची घोषणा | युवराज संभाजीराजे छत्रपती

Back to top button