सांगली वनविभागाच्या उपवनसंरक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल  | पुढारी

सांगली वनविभागाच्या उपवनसंरक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल 

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : सांगली वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने यांनी कार्यालयातील एका वनपरिक्षेत्र अधिकारी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. पीडित महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने संशयित माने यांच्या विरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल केली. पोलिसांनी उपवनसंरक्षक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वनपरिक्षेत्र महिला अधिकारी ही २८ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी उपवनसंरक्षक विजय माने यांच्या केबिनमध्ये सरकारी कामाची माहिती देण्यासाठी गेली होती. त्यावेळी संशयित माने यांनी डायरीतील नोंदी बघण्याचा बहाणा करून तिला जवळ बोलावून घेतले. त्यानंतर लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. अशी तक्रार पीडित महिलेने कुपवाड पोलिसात दाखल केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर यांनी तातडीने कुपवाड पोलिस ठाण्यात धाव घेऊन पीडित महिला अधिकाऱ्याची विचारपूस केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपवनसंरक्षक माने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील करीत आहेत. दरम्यान, उपवनसंरक्षक विजय माने हे सध्या प्रशिक्षणासाठी अमरावती येथे गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा  

Back to top button