अमरावती विभागाला ६.५८ लाख मेट्रिक टन खते | पुढारी

अमरावती विभागाला ६.५८ लाख मेट्रिक टन खते

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : आगामी खरीप हंगामाला घेऊन कृषी विभाग नियोजन आणि तयारीला लागला आहे. या अंतर्गत एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंत कृषी सहसंचालक कार्यालयाने विभागातील पाच जिल्ह्याकरिता 6 लाख 57 हजार 743 मेट्रीक टन खतांचे नियोजन केले आहे. या स्टॉकला आवश्यक सरकारी मंजूरी देखील प्राप्त झाली आहे.

यवतमाळ करिता सर्वाधिक 2.07 मे. टन

कृषी क्षेत्राकडून जिल्हानिहाय खतांचा स्टॉक उपलब्ध करण्यात आला आहे. यात यवतमाळ जिल्ह्याकरिता सर्वाधिक 2 लाख 7 हजार 670 मेट्रीक टन नियोजन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्याकरिता 1 लाख 14 हजार 942 मेट्रीक टन, बुलढाणा 1 लाख 77 हजार 562 मेट्रीक टन, अकोला 86 हजार 310 मे. टन तर वाशिम जिल्ह्याकरिता 71 हजार 250 मे. टन खताचे नियोजन करण्यात आले आहे.

2.18 लाख मे. टन कॉम्प्लेक्स खते

कृषी विभागाकडून युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी, कॉम्प्लेक्स खतांचा स्टॉक मंजूर करण्यात आला आहे. विभागाकरिता सर्वाधिक 2 लाख 18 हजार 443 मेट्रीक टन कॉम्प्लेक्स खते आहेत. युरीया 1 लाख 68 हजार 453 मे.टन, डीएपी 1 लाख 5 हजार 11 मे. टन, एमओपी 36 हजार 86 मे. टन, एसएसपी 1 लाख 29 हजार 741 मे. टन स्टॉक मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय मंजूर खतांचा स्टॉक (मेट्रीक टन)

जिल्हा युरीया डीएपी एमओपी एसएसपी कॉम्प्लेक्स एकूण

  • अमरावती 29,931 23,119 7,410 27,051 27,431 1,14,942
  • अकोला 23,561 15,290 4,669 16,839 25,951 86,310
  • बुलढाणा 38,431 27,161 8,119 33,151 70,700 1,77,562
  • यवतमाळ 65,369 22,410 14,069 38,061 67,761 2,07,670
  • वाशिम 11,161 17,031 1,819 14,639 26,600 71,250
  • एकूण 1,68,453 1,05,011 36,086 1,29,741 2,18,443 6,57,734

हेही वाचा  

Back to top button