हिंगोली : नवविवाहित पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून खून | पुढारी

हिंगोली : नवविवाहित पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून खून

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हळद काढण्यासाठी आलेल्या मजुर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खंजीरने गळ्यावर वार केला. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्‍यु झाला. ही घटना बुधवारी (दि.4) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. सारोळा येथील शिवारात हाळद काढणीसाठी पती-पत्नी आले होते.

सारोळा येथील शिवारात यासीन बागवान यांच्या शेतात मयत पत्नी अलका विश्वनाथ पोटे (वय 21) व पती विश्वनाथ मारोती पोटे (वय 23 रा. सोनवाडी, ता. औंढा) नागनाथ हे हळद काढणीसाठी आले होते. बुधवारी (दि.4) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पती विश्वनाथ पोटे याने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी अलका पोटे हिच्या मानेवर धारदार खंजीराने वार केला. यात अलका पोटे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाली.

याबाबतची माहिती ग्रामीण पोलिा ठाण्यास मिळाल्यानंतर तात्‍काळ घटनास्थळी धाव घेतली. मयताची आई अरुणा ढाकरे रा.कोठारवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा  

Back to top button