वडीगोद्री (जालना) , पुढारी वृत्तसेवा : वडीगोद्री -गोंदी रस्त्यावर धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. यामध्ये दुचाकीचा स्फोट होऊन दुचाकी जळून खाक झाली. ही घटना गुरूवारी (दि.५) सकाळी ११ वाजता घडली. दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकीस्वाराने प्रसंगावधान साधत उडीमारल्याने बचावला.
अंबड तालुक्यातील गोंदी येथून वडीगोद्रीकडे टरबूज विकण्यासाठी विलास बाबुराव पंचलोटे हे दुचाकी (क्रं-एम एच २१ – ९८५९) प्लॅटिना गाडीने जात असताना रस्त्यावर अचानक दुचाकीने पेट घेतला. त्याच क्षणी पंचलोटे क्षणाचाही विलंब न करता गाडीवरून खाली उडी मारली. त्याच क्षणी गाडीचा स्फोट झाला. उडी मारल्यामुळे विलास पंचलोटे हे या घटनेतून बचावले आहे. सुदैवाने त्यांना कुठलीही जीवितहानी झाली नाही. गाडीने अचानक कशामुळे पेट घेतला याचे नेमके कारण समजू शकले नाही.
विलास पंचलोटे म्हणाले, गाडी सकाळपासून उन्हामध्ये उभी होती व गाडीमध्ये ६ लिटर पेट्रोल होते. उन्हामध्ये गाडी उभी असल्याने ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात केला आहे.
हेही वाचा