कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणातील सहा जणांना दुहेरी जन्मठेप | पुढारी

कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणातील सहा जणांना दुहेरी जन्मठेप

पुणे : पुढारी वृत्तसेवा:  कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणातील सहा आरोपींना न्यायालयाने दुहेरी जन्मठेप व प्रत्‍येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मोक्का विशेष न्यायाधीश एस. एन. शिरसीकर यांच्‍या न्‍यायालयाने हा निकाल दिला.

संतोष भीमराव शिंदे (वय ३४), निलेश खंडू सोलनकर (वय ३०), राजेंद्र विजय गायकवाड (वय २४), आकाश सुनील महाडीक (वय २०), विष्णू यशवंत जाधव (वय ३७), नागेश लक्ष्मण झाडकर (वय २७) अशी दुहेरी जन्‍मठेपाची शिक्षा झालेल्या आराेपींची नावे आहेत. कलम १२० बी (कट रचने) व ३०२ (खून करणे ) या कलमांखाली आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

याप्रकरणी विशेष सरकारी वकील विकास शाह यांनी ४२ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,  बॅलेस्टीक तज्ज्ञ‍ डॉ. कुतूबुददीन मुलाणी यांची साक्ष आणि शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरला. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींना अधिकाधिक शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युकतिवाद विशेष सरकारी वकील शाह यांनी केला. न्यायालयाने तो मान्य करत सहा आरोपींना दुहेरी जन्मठेप व दोन हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा सुनावली.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button