हिंगोली : आखाडा बाळापूर शहराला टॅंकरने दररोज २ लाख लिटर पाणी पुरवठा | पुढारी

हिंगोली : आखाडा बाळापूर शहराला टॅंकरने दररोज २ लाख लिटर पाणी पुरवठा

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असता प्रशासनाच्या वतीने ४ मे (बुधवार) पासून दोन टॅंकरने दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

कळमनुरी तहसील प्रशासनाच्या वतीने आखाडा बाळापुरच्या परिसरातील सखाराम शेठ अग्रवाल व विजय पाटील बोंढारे तसेच तीन बोर अधिग्रहण केले असून या जलसाठ्याततून दोन टॅंकरच्या मदतीने दररोज चार लाख लिटर पाणी आखाडा बाळापूर शहरातील जलकुंभ मध्ये सोडण्यात येत आहे. त्यानंतर हे पाणी शहराच्या काही भागांमध्ये दोन दिवसाआड  योजनेच्या वतीने शहरवासीयांना पाणी मिळणार असल्याचे सरपंच भिमाबाई नरवाडे यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र संदीप नरवाडे यांनी सांगितले आहे.

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, डोंगरगाव फुल येथील कयाधू नदीच्या पात्रातून जिल्हा कुंभार पाणी भरण्यात येत असून, तसेच आखाडा बाळापुर शहरांमध्ये असलेल्या जलकुंभाच्या वतीने आलेले पाणी सोडण्यात येत आहे. दर दोन दिवसानंतर शहराच्या विविध भागात पाणी देण्यात येत आहे. शहराला दररोज १४ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असून; त्यामानाने हे पाणी कमी प्रमाणात सोडण्यात आलेली दिसते. त्यामुळे मुबलक नसले तरी बराचसा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात वैशाख उन्हाळ्याच्या तीव्रतेत पाणी भरण्यासाठीची पायपीट कमी झाल्याचे दिसते.

हेही वाचलंत का? 

Back to top button