ओझर-पिंपळगाव सर्व्हिस रोडवर आढळला अज्ञाताचा मृतदेह, परिसरात खळबळ | पुढारी

ओझर-पिंपळगाव सर्व्हिस रोडवर आढळला अज्ञाताचा मृतदेह, परिसरात खळबळ

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
येथील ओझर-पिंपळगावच्या सर्व्हिस रोडवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी ओझर पोलिसांत नोंद करण्यात आली असून, ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

गेल्या 30 एप्रिलला दुपारी 12 पूर्वी ओझर ते पिंपळगावकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवरील दुर्गा मंदिराजवळ रोडच्या कडेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याचे वय अंदाजे 38 वर्षे, उंची साधारण 168 सेंमी, रंगाने काळा-सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, शरीराने सडपातळ, डोक्याचे केस काळे, मिशी बारीक, अंगात फुलबाहीचा सफेद रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची अंडरपॅन्ट, पायात राखाडी रंगाची पॅन्ट अशा वर्णनाच्या व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास ओझर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ओझर पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक तुकाराम वारे यांनी केले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button