नाशिक-पुणे रेल्वेसाठी पहिली खरेदी, ‘य़ेथील’ महिला शेतकर्‍याने दिली जमीन | पुढारी

नाशिक-पुणे रेल्वेसाठी पहिली खरेदी, 'य़ेथील' महिला शेतकर्‍याने दिली जमीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुणे-नाशिक नवीन दुहेरी मध्यम द्रुतगती ब्रॉडगेज लाइनचे (सेमी हायस्पीड) विद्युतीकरणासह बांधकामासाठी प्रस्तावित खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याची कार्यवाही आहे. यासाठी सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री येथील महिला शेतकर्‍याने या रेल्वेसाठी जमीन दिली आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ही पहिली खरेदी नोंदवली गेली आहे.

सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री येथील शेतकरी श्रीमती कमळाबाई कुर्‍हाडे यांनी गट क्रमांक 673 मधील 0.59 हेक्टर क्षेत्राचे खरेदीखत सिन्नर येथील निबंधक कार्यालयात करून दिले. या जमिनीच्या बदल्यात जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला रक्कम एक कोटी, एक लाख चौर्‍यांऐंशी हजार सातशेसाठ रुपये संंबंधित शेतकर्‍यांना देण्यात आला.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे नाशिक जिल्ह्यातील पहिले खरेदोखत नोंदवण्यात आले आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात संपादित होणार्‍या इतर भूधारकांनीही थेट खरेदी करण्यास संमती देऊन लवकरात लवकर खरेदीखत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री गंगाथरन यांनी केले आहे. खरेदीखत नोंदवण्याची मुभा फक्त पुढील सहा महिन्यांसाठी करण्यात आलेली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.

हेही वाचा :

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pudhari (@pudharionline)

Back to top button