Chitra Wagh | ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर; चित्रा वाघांचा गंभीर आरोप | पुढारी

Chitra Wagh | ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर; चित्रा वाघांचा गंभीर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणूक प्रचारातील जाहीरातींमध्ये पॉर्नस्टार पात्र वापरल्याचा दावा भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात पब आणि पॉर्नची संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहे का?, त्यांना महाराष्ट्रात पॉर्न पब पार्टी सुरू ठेवायची आहे का? असा सवाल करत चित्रा वाघ यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जाहिरातींवर आक्षेप घेतला. आज (दि.२) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. (Chitra Wagh On Thackeray)

हाच पॉर्न स्टार लहान मुलींच्या सोबत अश्लिल चित्रीकरण करत असल्याचेदेखील चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपामध्ये म्हटले आहे. हेच पात्र एका ॲपवरती अश्लिल कृत्ये करताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्रात पब-पाटी-पॉर्न आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून महिलांचा आपमान होत असल्याचेही त्या म्हणाल्या. यावर ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. (Chitra Wagh On Thackeray)

Back to top button