रत्नागिरी : शेतकर्‍यांना मिळणार घरबसल्या हवामानाचा अंदाज | पुढारी

रत्नागिरी : शेतकर्‍यांना मिळणार घरबसल्या हवामानाचा अंदाज

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : शेती, शेती आणि सिंचन, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी हवामानाचा अंदाज मराठीसह अन्य 24 सोप्या भाषेत सांगणारे अ‍ॅप आता लवकरच उपलब्ध होणार आहे. भारतीय हवामान विभाग आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संयुक्तपणे ही प्रणाली विकसित करण्यात येत असून ती लवकरच शेतकर्‍यांसाठी उपलब्ध होणार आहे.

भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने ही प्रणाली विकसीत करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण, शहरी आणि जिल्हा स्तरावरील नागरिकांसाठी हवामानाचे अंदाज सोप्या पद्धतीने समजण्यासाठी या प्रणालींची निर्मिती केली जाणार आहे.

सेन्सर आणि ड्रोनवर आधारित देखरेख करणारी प्रणाली, पाणी आणि अन्नसुरक्षेसाठी हवामानाचा अंदाज व्यक्त करणारे कृषी तंत्रज्ञान, स्वयंचलित पूर्वचेतावणी प्रणाली, हवामान आणि आरोग्य, विद्युत व्यवस्थापन, पवन ऊर्जा आणि उष्णतेच्या लाटांचा अंदाज सांगणारी प्रणालीची निर्मिती या माध्यमातून करण्यात येणार आहे.

नवी प्रणाली मराठीसह अन्य भाषेतही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या हवामानाचा अंदाज शेतकर्‍यांसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Back to top button