Fruit eat time : फळे खातायं; मग ‘या’ टिप्स तुमच्यासाठी… | पुढारी

Fruit eat time : फळे खातायं; मग 'या' टिप्स तुमच्यासाठी...

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

वजन कमी करायचे असाे की, निराेगी राहण्यासाठी फळांचे सेवन केले जाते. ( Fruit eat time ) फळांना आपल्या आहारात खूप महत्त्‍वाच स्थान आहे; पण तुम्हाला विचारले की, फळे अवेळी खाणे चुकीचं आहे का? तर बहुतांश लोकांचा उत्तर ‘नाही’ असेच येणार; पण तुम्हाला माहीत आहे का? अवेळी फळ खाणं हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. ; पण तुम्हाला माहीत आहे का? फळ कधी खावावीत. ( Fruit eat time) आहारात त्‍यांचा समावेश केव्‍हा करावा. यासाठी या टिप्स…

 फळ खाण्याची सुध्दा एक वेळ असते. त्याला वैज्ञानिक कारणेही आहेत. घरातील वडीलधाऱ्यांकडून तुम्‍ही एकलं असेल की, सफरचंद सकाळी खावे तर केळ दुपारच्या दरम्यान खावा.  ते जे सांगत होते त्याला वैज्ञानिक असं कारणही आहे. प्रत्येक फळाच्या सेवनाने मानवी शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो. ते कधी आणि कशाबरोबर खाता हे खूप महत्त्वाचं ठरते.

 Fruit eat time – फळ कधी खावावीत 

फळ आपल्या आहारातील महत्त्वपूर्ण असा घटक आहे. फळांमध्ये बरीच उर्जा आणि पोषकतत्वे असतात जी मानवी शरीरास आवश्यक असतात. आपलं आरोग्य जपण्यासाठी फळ हा उत्तम घटक आहे; पण फळ कधी आणि का खावी हे महत्त्वाचं ठरतं.

  • सकाळी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये सफरचंद, पेरु, कीवी, स्ट्रॉबेरी, पपई, संत्री, लिची ही फळे खावू शकता. 
  • स्नॅक म्हणून तुम्ही  सफरचंद आणि केळ खावू शकता. 
  • संध्याकाळच्या वेळेस जर तुम्हाला फळ खाण्‍याची इच्छा झाली तर चेरी, अननस, संत्री, किवी खावू शकता. 

प्रत्येक  फळात वेगवेगळे पोषक तत्वे असतात. दिवसातून किमान तीन फळे वेगवेगळी वेळत खावावीत. ती तुम्हाला हेल्दी ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतील. फळांचा ज्युस करणे शक्यतो टाळा. जेवण करण्यापूर्वी फळ खावावीत त्‍यामुळे पचनक्रिया सुधारते. रात्री जेवणानंतर फळे खाणे हे शरीरासाठी अपायकारक ठरुही शकते. 

हेही वाचलंत का?

Back to top button