राणा माफी मागत नाहीत, तोपर्यंत शिवसैनिक हलणार नाहीत : अनिल परब | पुढारी

राणा माफी मागत नाहीत, तोपर्यंत शिवसैनिक हलणार नाहीत : अनिल परब

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क

जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत शिवसैनिक हलणार नाहीत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमचे शिवसैनिक गदाधारी आहेत. मातोश्री आमचं दैवत आहे. त्याकडे वाकडी नजर करून बघू नये, असा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला. दरम्यान, राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार येथील आपल्या निवासस्थानी आहेत. राणांच्या घरांसमोरही शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.

दौऱ्याचं निमित्त काढून राणांनी पळ काढला; पण, त्यांनी माफी मागावी. जोपर्यंत राणा दाम्पत्य माफी मागत नाही, तोपर्यंत शिवसैनिक ऐकणार नाही. पोलिसांनी राणा दाम्पत्यावर कारवाई करावी. राणांविरोधात पोलिसांत आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. पोलिसांनी दखल घेऊन कारवाई करावी. राणा दाम्पत्याने शिवसेनेविरोधात प्रक्षोभक वक्तव्ये केली आहेत, असेही परब म्हणाले.

 

खार, मुंबई येथे राणा यांच्या घराबाहेर हजारो शिवसैनिक जमले आहेत. राणा यांना घराबाहेर पडू देणार नाही. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केलीय. ‘मातोश्री’समोर अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी सकाळी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे आव्हान दिले हाेते. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी ‘मातोश्री’समोरच ठाण मांडले आहे. मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button