प्राजक्ता माळी : ‘त्याच्यासाठी ११ वीत प्रेमकविता लिहिली अन् आईचा चोप खाल्ला’ | पुढारी

प्राजक्ता माळी : 'त्याच्यासाठी ११ वीत प्रेमकविता लिहिली अन् आईचा चोप खाल्ला'

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्राजक्ता माळी हिने अगदी अल्पावधीमध्ये मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची खास जागा निर्माण केली आहे. प्राजक्ता बोलताना प्राजंळपणाने बऱ्याच गोष्टी बोलून जाते. तिचा एक कवितासंग्रही प्रसिद्ध झाला आहे.

“मी ११वीत असताना पहिल्यांदा कविता लिहिली होती आणि माझ्या क्रशसाठी लिहिली होती, त्यामुळे आईचा मारही खाल्ला होता,” अशी कबुली प्राजक्ता प्राजक्ता माळी हिने दिली आहे.

“मी एका डायरीत लिहिलं होतं. ती आईच्या हाती लागली त्यामुळे मार खावा लागला होता. त्यात नेमक काय लिहिलं होतं, ते आता आठवत नाही. पण त्या प्रेमाबद्दल काहीतरी लिहिलं होतं. अभ्यास करण्याच्या वयात प्रेमकविता लिहिल्याने मार खावा लागला होता” असं तिनं सांगितलं.

११ वीत असताना एका मुलावर प्रेम होतं. त्यावेळी पहिली कविता लिहिली होती, असं सांगितलं. सगळेच सिक्रेट मी या कविता संग्रहातून वाचकांपुढे येत आहेत, असं प्राजक्तानं सांगितलं.

पुढारी ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने ही माहिती दिली. कविता संग्रहातील कविता या स्वतःच्या जीवनावरच आहेत, असं तिने  नमूद केलं.

“फार जुन्या कविता यात नाहीत. २०१२ पासूनच्या डायरी माझ्याकडे आहेत, त्यातील कविता यात आहेत. पण लगेच कवयित्री म्हणून मला टॅग लावावा अशी इच्छा नाही.”

या कविता प्रसिद्धीसाठी लिहिल्या नव्हत्या पण पण फॅमिली आणि मित्रांनी प्रोत्साहन दिल्याने कवितासंग्रह प्रसिद्ध केला.

प्राजक्तप्रभा असं या कवितासंग्रहाचं आहे. प्राजक्ता नावाच्या अवतीभवती नाव असावं म्हणून हे नाव दिल्याचं ती म्हणाली.

हे ही वाचलं का?

Back to top button