शिल्‍पा शेट्‍टी म्‍हणाली, ‘मीडिया ट्रायल नको, मुलांची प्रायव्‍हसी जपा’ | पुढारी

शिल्‍पा शेट्‍टी म्‍हणाली, 'मीडिया ट्रायल नको, मुलांची प्रायव्‍हसी जपा'

मुंबई ;पुढारी ऑनलाईन : पती राज कुंद्रा याच्‍या अटकप्रकरणी अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी हिने अखेर मौन सोडले आहे. मात्र या प्रकरणी अपुर्‍या माहितीच्‍या आधारे माझी व माझ्‍या कुटुंबीयांची मीडिया ट्रायल घेण्‍यात येवू नये. माझ्‍या मुलांची प्रायव्‍हसी जपावी, अशी विनंती करत, माझा न्‍यायव्‍यवस्‍था आणि मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्‍वास आहे, असे निवेदन शिल्‍पा शेट्‍टी हिने जाहीर केले आहे.

पॉर्न व्‍हिडीओ रॅकेटप्रकरणी शिल्‍पाचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली हाेती. सध्‍या तो न्‍यायालयीन कोठडीत आहे. राज कुंद्राविरोधात ठोस पुरावे असल्‍याचे मुंबई पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍याचबरोबर या प्रकरणात शिल्‍पा शेट्‍टीचा सहभाग आहे का, याचा तपास  गुन्‍हा अन्‍वेषण विभाग करत आहे. या प्रकरणी तिने निवेदनाच्‍या माध्‍यमातून आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

निवेदनात शिल्‍पाने म्‍हटले आहे की, मागील काही दिवस माझ्‍या कुटुंबासाठी आव्‍हानात्‍मक होते. आमच्‍यावर अनेक आरोप करण्‍यात आले.

साेशल मीडियावर मला व माझ्‍या कुटुंबाला ट्रोल करण्‍यात आले. माझ्‍यासह माझ्‍या कुटुंबीयांनाह याला सामोरे जावे लागले. याप्रकरणी यापुढेही मी काहीही बोलणार नाही. गप्‍पच राहणार आहे. कारण हे प्रकरण न्‍यायालयात आहे.

कृपया माझ्‍या बद्‍दल चुकीची माहिती देवू नका. एक सेलेब्रिटी म्‍हणून मी नेहमीच ‘तक्रार करायची नाही तसेच कोणाला कधीच समजवायचे नाही’ या विचारानेच जगले आहे.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मला मुंबई पोलिस आणि न्‍यायव्‍यवस्‍थेवर पूर्ण विश्‍वास आहे.

एक कुटुंब म्‍हणून आम्‍ही कायद्‍याचीही मदत घेत आहेत. माझी आई व मुलांच्‍या प्रायव्‍हसीचा विचार करावा.

अपुर्‍या माहितीच्‍या आधारे विधाने करु नका, असे आवाहनही तिने आपल्‍य निवेदनात केली आहे.

आमची मीडिया ट्रायल होवू नये. कृपया कायद्‍याला आपले काम करु द्‍यावे, सत्‍यमेव जयते, असेही शिल्‍पाने आपल्‍या निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button