पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय मेजवानीमध्ये सर्वात प्रसिद्ध पदार्थ कोणता आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? सहाजिकच, त्याचं उत्तर आहे पनीर! खासकरून तुम्ही शाकाहारी असाल आणि तुमच्याकडे कोणता पर्याय नसेल तर… पनीर (Paneer) हाच पर्याय तुम्ही निवडाल. निर्विवादपणे, पनीर हा शाकाहारी लोकांना खूप प्रिय आहे.
पनीर कशी तयार केली जाते, त्यापेक्षा त्याची चव किती टेस्टी, हे जास्त महत्वाचं आहे. आशिया उपखंडात खासकरून भारतामध्ये हा पदार्थ खूपच प्रसिद्ध आहे. हे पनीर नेमकं कुठून आलं? त्याच्या पाठीमागचा इतिहास काय? प्रत्येक पनीरप्रेमी माणसाला पनीरच्या इतिहासाबद्दल माहिती असलाच पाहिजे…
पनीर हा सामान्यपणे वापरला जाणार पदार्थ आहे. भारताच्या पारंपरिक पदार्थामध्ये पनीरचा समावेश असतोच. भारतीय पनीर हे ताजं आणि न वितळणारा पदार्थ आहे. दुधात लिंबाच्या रसाचे थेंब टाकून दही तयार केले जाते. या दह्याला चेना किंवा काॅटेज चीज असंही म्हणतात. या काॅटेज चीज आणि पनीरमध्ये थोडासा फरक आहे. तो म्हणजे काॅटेज चीजमध्ये थोडंस मीठ टाकलं जातं.
पनीर हा पर्शियन शब्द आहे, हा शब्द कोणत्याही प्रकारच्या पनीरला वापरला जातो. इतर देशांमध्ये पनीर (Paneer) या शब्दाचं स्पेलिंग बदललं जातं. पण, उच्चार सारखाच असते. उदाहराणार्थ. तुर्कीमध्ये Peynir, तर अमेरिकेमध्ये 'Panir' असंही म्हंटलं जातं. १७ व्या शतकात पोर्तुगिजांनी बंगालमध्ये पहिल्यांदा पनीर पदार्थ तयार केला.
पनीरच्या निर्मितीची दुसरी कथादेखील सांगितली जाते की, अफगाणिस्तान आणि इराणी प्रवासी भारतात आले. त्यांनी पहिल्यांदा दक्षिण आशियाच्या उत्तर-पश्चिम भागात पनीरचा पदार्थ आणला. सध्या पनीरमध्ये अनेक प्रकार पहायला मिळतात. जगाच्या विविध भागांमध्ये पनीरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस मिळतात.
आपण जवळच्या दुकानातून पनीर विकत आणतो. पण, घरात पनीर तयार करणं खूप सोपी गोष्ट आहे. गरम दुधात लिंबाच्या रसाचे थेंब टाकले जातात. त्यातील पाणी काढून टाकण्यासाठी मलमलच्या कपड्याच्या मदतीने दही आणि पनीर वेगळे केले जाते. नंतर हे पनीर थंड पाण्यात आणि फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवले जाते. अशाप्रकारे दही तयार करून मोठ्या प्रमाणात भारतीय पदार्थांमध्ये वापरले जाते.
पनीर हे भरपूर प्रथिनं असणारा पदार्थ आहे. स्नायू आणि हाडे बळकट करते. पनीरमध्ये फायबरचं प्रमाण असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. तसेच रक्तातील साखर आणि वजन कमी करण्यासाठी पनीर उपयुक्त पदार्थ आहे. त्यामुळे पनीर खा! तंदुरुस्त रहा!!
पहा व्हिडीओ : चटकदार लोणसे कसे तयार करायचे, जाणून घ्या…