नाशिक : दिंडोरीच्या पायलचे ‘एमपीएससी’त यश ; ‘या’ पदावर झाली नियुक्ती | पुढारी

नाशिक : दिंडोरीच्या पायलचे 'एमपीएससी'त यश ; 'या' पदावर झाली नियुक्ती

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी-रयत शिक्षण संस्थेच्या जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयात कार्यरत असलेले उपशिक्षक बापू दिवे यांची कन्या पायल दिवे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परिक्षेत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा या विभागात सहाय्यक अभियंता पदासाठी निवड झाली आहे.
पायल ही रयत शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे. तीने वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इंन्स्टिट्युट, माटुंगा, मुंबई युनिव्हर्सिटी येथे आपले अभियांत्रिकी पदवी पर्यंतचे शिक्षण सन 2018 साली पूर्ण केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2019 मध्ये झालेल्या परिक्षेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये पायल दिवे हिची निवड झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळण्यासाठी पायलने घेतलेल्या परिश्रमाचे व तिचे वडील बापू दिवे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे परिसरातून कौतुक होत आहे.
हेही वाचा : 

Back to top button