राहुल गांधींनी पुन्हा परदेशात मारली कलटी | पुढारी

राहुल गांधींनी पुन्हा परदेशात मारली कलटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी परदेश दौरावर निघाले आहेत. काँग्रेसकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.  राहुल गांधी परदेशात जाण्याअगोदर तेलंगणाचा दौरा करतील. नुकतेच तेलगंणातील काँग्रेस नेत्यांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत येत राहुल गांधींची भेट घेतली होती.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला अनेक संकटांचा सामना करत आहे. दरम्यान, राहुल गांधी पक्ष खराब अवस्थेत असताना परदेश दौरावर निघाले आहेत. भाजपने यापुर्वीच राहुल गांधींनी पार्टटाईम नेता असा उल्लेख केला होता. यावेळेस भाजप ही संधी सोडणार नाही.

कोल्हापूर : समरजितसिंह घाटगे यांच्यावरील कारवाईसाठी हसन मुश्रीफ समर्थकांचा मोर्चा

पाच महिन्यात दुसऱ्यांदा परदेश दौरा

राहुल गांधी एप्रिलच्या दुसऱ्या महिन्यात विदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र हा दौरा स्थगित करण्यात आला होता. गेल्या पाच महिन्यांत हा राहुल गांधींचा दुसरा विदेश दौरा आहे. याअगोदर राहुल गांधी डिसेंबर २०२१ मध्ये जवळपास १ महिन्यासाठी परदेश दौऱ्यावर होते, हा  दौरा त्यांनी वयक्तिक कारणासाठी केला होता.

हेही वाचलंत का?

Back to top button